Ad will apear here
Next
हर्ष मंत्रवादीला अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद
बुद्धिबळ स्पर्धेत विजेत्यांसह शरयू टिकेकर, दिलीप टिकेकर.

रत्नागिरी : नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या शहरस्तरीय अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत हर्ष मंत्रवादी याने विजेतेपद पटकावले. १५ फेर्‍यांमध्ये स्पर्धेतील तिसर्‍या मानांकित हर्षने १२ गुणांसह प्रथम क्रमांकावर निर्विवाद वर्चस्व राखले. अनिकेत रेडीज याने १०.५ गुणांसह दुसरा, तर १४ वर्षांच्या यश गोगटे याने १० गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.

यशने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मानांकित खेळाडूंविरुद्ध सामने जिंकले. साईप्रसाद साळवी व निमिष म्हाडेश्वर यांनी प्रत्येकी ९.५ गुणांसह अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. पंधरा वर्षांखालील वयोगटातील उत्तेजनार्थ पारितोषिके आयुष मयेकर, क्रिश डोईफोडे यांनी पटकावली, तर अकरा वर्षांखालील वयोगटात आशय मयेकर, ऋतुराज पांचाळ यांनी प्रथम दोन क्रमांक प्राप्त केले.

शहरातील १४ फिडे मानांकनप्राप्त बुद्धिबळपटूंसह एकूण ३० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले. सर्व विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे व बुद्धिबळाची पुस्तके देऊन गौरविण्यात आले. मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीमध्ये झालेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला मनोहर पराडकर, शरयू टिकेकर, दिलीप टिकेकर, मंगेश मोडक, सुहास कामतेकर, कीर्ती मोडक, स्वरा कात्रे, चैतन्य भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZYPBT
Similar Posts
रत्नागिरीतील १० वर्षांच्या आशयला फिडे मानांकन रत्नागिरी : रत्नागिरीतील मयेकर कुटुंबाने एक वेगळीच चमकदार कामगिरी केली आहे. या कुटुंबातील आशय या १० वर्षांच्या मुलाने नुकतेच बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे. याआधी त्याचा मोठा भाऊ आयुष यानेही फिडे मानांकन प्राप्त केले असून, त्यांचे वडील जयेश मयेकरही फिडे मानांकनप्राप्त बुद्धिबळपटू आहेत
रत्नागिरीत सप्रे स्मृती खुली बुद्धिबळ स्पर्धा रत्नागिरी : सन १९५५मधील पहिल्यावहिल्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेते आणि दोन वेळा जागतिक ऑलिंपियाड स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रत्नागिरीमध्ये खुल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ व १०
रत्नागिरीतील विवेक सोहनी झाले आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच रत्नागिरी : रत्नागिरीतील विवेक सोहनी हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच झाले आहेत. जागतिक बुद्धिबळ संघटनेची प्रेसिडेंशिअल बोर्ड मीटिंग हंगेरी देशातील बुडापेस्ट येथे सात आणि आठ सप्टेंबरला झाली. त्या वेळी सोहनी यांच्या आंतरराष्ट्रीय पंच पदवीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अशी कामगिरी करणारे सोहनी हे दक्षिण महाराष्ट्रातील पहिलेच ठरले आहेत
रत्नागिरीच्या खेळाडूंनी केली पदकांची लयलूट रत्नागिरी : नाशिक येथे झालेल्या राज्य युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी बक्षिसांची लयलूट केली. महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातून निवड झालेल्या चारही बुद्धिबळपटूंनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language